Mahie Gill Marriage :  बॉलिवूड अभिनेत्री माही गिलनं (Mahie Gill) आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून माही ही चित्रपटसृष्टीतून लांब आहे. पण नुकतीच तिच्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. 'देव डी' आणि 'साहेब बीवी और गँगस्टर' सारख्या चित्रपटांतून आपली अभिनयक्षमता सिद्ध करणारी माही यावेळी तिच्या कामामुळे नाही तर तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. माहीनं हा खुलासा केल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री माही गिलने पंजाबी चित्रपटातील अभिनेता आणि उद्योजक रवी केसरसोबत लग्न केले आहे. माही आणि रवीनं 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'फिक्सर'  वेब सीरिजमध्ये काम केले होते. मात्र, माही आणि रवी हे गेल्या 10 वर्षांपासून रिलेशशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. इतकंच नाही तर माही गिल तिचा नवरा आणि मुलगी वेरोनिकासह गोव्यात शिफ्ट झाल्याचे देखील सांगितले जात. तिच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी जेव्हा तिला एका मीडिया पोर्टलनं कॉल केला होता. तेव्हा तिनं तिचं लग्न झाल्याचं कबुल केलं. पण माहीनं अजून याविषयी सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिलेली नाही.



हेही वाचा : 25 वर्षांनंतर Salman Khan आणि करण जोहर येणार एकत्र?


माही गिल ने कधी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधी बोलत नाही. 2019 साली जेव्हा माहीनं खुलासा केला की तिला अडीच वर्षांची मुलगी आहे तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. तर लग्नाविषयी बोलताना माही एका मुलाखतीत म्हणाली की 'मला लग्न करण्याची काय गरज आहे?  मी अशीही आनंदी आहे आणि मला वाटतं की लग्न न करता देखील आपण आनंदी राहू शकतो. विवाहाशिवायही कुटुंब आणि मुलं असू शकतात. मुलांसाठी आणि कुटुंबासाठी लग्न करणं गरजेचं आहे असे मला वाटत नाही. लग्न ही एक सुंदर गोष्ट आहे पण करायचं की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. 



कोण आहे माही गिल? 


माही गिलचे खरं नाव रिम्पी कौर गिल आहे. माहीचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी माहीनं अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी आणि पंजाबी व्यतिरिक्त माही गिलनं तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण माहीला खरी लोकप्रियता ही 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'देव डी' या चित्रपटामुळे मिळाली होती. या चित्रपटासाठी माहीला 2010 मध्ये फिल्मफेअर बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिकचा पुरस्कार मिळाला होता.