मुंबई : 60-70 च्या दशकात अभिनेत्री माला सिन्हा त्यांच्या करिअरच्या Peak वर होत्या. धर्मेंद्रसोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. माला सिन्हा यांच्या प्रेमात अनेक अभिनेते होते, पण त्यांना नेपाळी अभिनेते चिदंबरम यांच्यावर प्रेम होते. माला आणि चिदंबरम यांना लग्न करायचे होते. घरच्यांचाही त्यांच्या नात्यावर आक्षेप नव्हता, मात्र, घरच्यांच्या आग्रहामुळे माला यांना पतीसोबत तीनदा लग्न करावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : धक्कादायक! निर्मात्यांकडून चित्रपटासाठी खरा बलात्कार आणि हत्या..., जगभरात Ban आहे 'हा' चित्रपट
 
माला यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात नेपाळी चित्रपटातून केली हे खरं आहे. या चित्रपटांमध्ये काम करत असताना त्यांना सहकलाकार चिदंबरम आवडू लागले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि घरच्यांनीही त्याला होकार दिला. मात्र कुटुंबीयांनी मग एका गोष्टीवर अडवले. वास्तविक माला सिन्हा यांचे वडील ख्रिश्चन आणि आई नेपाळी होती. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या रितीरिवाजानुसार हा विवाह लावण्यावर ठाम होता. (actress mala sinha had to marry three times with her own husband know why) 


जेव्हा कोणीही कोणाचं ऐकायला तयार नव्हते तेव्हा शेवटी माला सिन्हा आणि चिदंबरम यांना तीनदा लग्न करावे लागले. सगळ्यात आधी दोघांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार, नंतर हिंदू रितीरिवाजांनुसार आणि नंतर कोर्ट मॅरेज केले. माला सिन्हा लग्नानंतर काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. खरंतर, त्यांचे पती चिदंबरम यांनी लग्नानंतर चित्रपट करणार नाही अशी अट घातली होती, पण माला सिन्हा यांचे अभिनयावर असलेले प्रेम पाहून चिदंबरम यांनी आपली अट मागे घेतली होती.