टॉपच घालायला विसरली मलायका, करण जोहरच्या पार्टी लूकमुळे ट्रोल
मलायका अरोरा करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत टॉप घालायला विसरली, तिने बोल्ड इनरवेअर केले फ्लॉंट
मुंबईः नुकतीच करण जोहरची बर्थडे पार्टी पार पडली. या पार्टीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण सर्वात जास्त लाइमलाइटमध्ये राहिली ती मलायका अरोरा.
बुधवारी करण जोहरने त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत बॉलीवूडचे जवळपास सर्वच स्टार्स पोहोचले होते, मात्र सगळ्यात जास्त कोण चर्चेत असेल तर ती मलायका अरोरा.
तिने या पार्टीसाठी असा ड्रेस परिधान केला होता की लोकांनी तिला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.
मलायका अरोरा नुकतीच करण जोहरच्या पार्टीत पोहोचली होती, ज्यासाठी तिने एक आउटफिट निवडला होता ज्यामुळे ती ट्रोल झाली. मलायकाने बोल्ड दिसण्यासाठी असा लुक स्वीकारला की, आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले.
तिने चमकदार हिरव्या रंगाची पँट आणि जॅकेट घातलं होतं. मलायकाने आत चमकदार गुलाबी रंगाची ब्रा घातली होती.
मलायका अरोराच्या या लूकमध्ये तिची हिल देखील चर्चेत होती. तिने चमकदार गुलाबी रंगाची हिल्स घातल्या होत्या. ज्यावर लोकांचे लक्ष न नकोसे होऊन जात होते. या पार्टीत मलायका तिची बहीण अमृता अरोरा आणि मैत्रिण करीना कपूरसोबत पोहोचली होती.
मलायकाच्या या पार्टी लुकला लोक खूप ट्रोल करत आहेत. मलायकाच्या ड्रेसिंग सेन्सची कुणी खिल्ली उडवली, तर कुणी तिला वल्गर म्हटले. मलायका टॉप घालायला विसरली असेही एकाने सांगितले.