Manasi Naik Ex Husband: मराठी नृत्यांगना आणि अभिनेत्री मानसी नाईकच्या Ex नवऱ्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मानसीच्या Ex नवऱ्याने नुकताच साखरपुडा केला आहे. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रदीपच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदीप खरेरासोबत मानसी नाईकने 19 जानेवारी 2021 रोजी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला आहे. आता प्रदीपने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीपच्या साखरपुड्याच्या व्हिडीओने सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रदीप लवकरच लग्न देखील करणार आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव विशाखा जाटनी आहे. 


विशाखाची पोस्ट व्हायरल 


विशाखाने तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने प्रदीपला टॅग केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रदीप आणि विशाखा दोघांनी मॅचिंग कपडे परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. त्याच बरोबर व्हिडीओमध्ये दोघांनी त्यांच्या अंगठ्यांची खास झलकही चाहत्यांना दाखवली आहे. विशाखाने या व्हिडीओला Finally engaged We did it असं कॅप्शन दिलं आहे.  चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओ कमेंट करत त्या दोघांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रदीप आणि विशाखाने एकत्र म्युझिक अल्बमही केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप आणि विशाखा डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. दोघांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आले होते. एकत्र काम केल्यानंतर आता प्रदीप आणि विशाखाने आयुष्यात देखील एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा देखील झाला आहे.