अभिनेत्री मंदाकिनीची मुलगी तिच्या इतकीच सुंदर, PHOTO पाहून फॅन्स म्हणाले `तोच चेहरा`
`राम तेरी गंगा मैली` चित्रपटातून मंदाकिनी रातोरात स्टार बनली होती. तिच्या एका बोल्ड सीनने सगळ्यांनाच धक्का दिला होता.
मुंबई : अभिनेत्री मंदाकिनी बॉलिवूडमधली एक अशी अभिनेत्री होती. जी एकेकाळी लोकांमध्ये खूपच चर्चेत होती. 1985 मध्ये आलेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात ती राजीव कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या निरागसतेची आणि सौंदर्याची जोरदार चर्चा रंगली आणि ती रातोरात स्टार बनली. मात्र नंतर तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि आता 26 वर्षानंतर मंदाकिनीने पुनरागमन केले आहे आणि सध्या ती खूप चर्चेत आहे. (mandakini daughter rabze innaya)
मंदाकिनीची मुलं आता मोठी झाली आहेत. म्युझिक व्हिडिओमध्ये ती आपल्या मुलासोबत आली होती, तर तिची सून बुशराही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती एक निर्माता आहे आणि नेटफ्लिक्ससाठी कंटेंट तयार करते. याबाबत तिने तिच्या इन्स्टा बायोमध्ये माहिती दिली आहे. यासोबतच ती तिच्या कामाशी संबंधित अनेक फोटो ही पोस्ट करत असते.
आज आपण मंदाकिनीच्या मुलीबद्दल बोलत आहोत. मंदाकिनीची मुलगी आता मोठी झाली असून ती दिसायला तिच्या आईसारखीच आहे. तिच्या मुलीचे नाव राबजे इनाया ठाकूर आहे. राबजेचा फोटो पाहून कोणीही म्हणेस की, ती तिच्या आईची कॉपी आहे.
मंदाकिनी राम तेरी गंगा मैली नंतर 'डान्स डान्स', 'लडाई', 'कहां है कानून', 'नाग नागिन', 'प्यार के नाम कुर्बान', 'प्यार करके देखो' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली. मंदाकिनी शेवटची 1996 मध्ये गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम कोठारी यांच्यासोबत 'जोरदार' चित्रपटात दिसली होती.
राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात मंदाकिनीने ट्रान्सपरंट साडी नेसून खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. 90 च्या दशकातील या अभिनेत्रीचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडले गेले होते.