Nusrat Jahan Bold Look: बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां कायम हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या महिला खासदार नुसरत जहां आता मात्र बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या फोटोंवर चाहेत कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरत जहां यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'Saying bye to diet now… Pujo eshegeche ' असं लिहीलं आहे. सध्या नुसरत यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


नुसरत जहां सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, नुसरत जहां पुन्हा एकदा आपले काही फोटो शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.


सांगायचं झालं तर, नुसरत यांचे  वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले आहे. त्यांचं पहिलं लग्न 2019 मध्ये तुर्कीतील बिझनेसमन निखिल जैनसोबत झालं होतं. पण 2020 मध्ये दोघे वेगळे राहू लागले. दरम्यान, नुसरत गरोदर असल्याची बातमी आली आणि निखिलने सांगितले की, हे मूल त्याचे नाही.




यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्तासोबत जोडले जाऊ लागले. 2021 मध्ये ऑगस्टमध्ये नुसरत यांनी इशान या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर यशचे नाव लिहिले होते. याशिवाय यशच्या वाढदिवशी नुसरत यांनी केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी यशला पती आणि मुलाचा पिता असल्याचे सांगितलं.