प्रसिद्ध अभिनेत्रीची मोठी घोषणा, पतीच्या निधनानंतर दान करणार आपल्या शरीरातील `हे` अवयव
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा निर्णय जाणून चाहते थक्क
मुंबई : तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीनाने अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. सोशल मीडियावर, अभिनेत्री म्हणाली, "जीव वाचवण्यापेक्षा कोणतंही मोठं कार्य नाही. अवयव दान हा एक जीव वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे एक वरदान आहे. दीर्घ आजाराला झुंज देणाऱ्या अनेकांसाठी ही दुसरी संधी असते. ज्याचा मी वैयक्तिकरित्या सामना केला आहे."
अभिनेत्री मीना पुढे म्हणाली, " कदाचित माझ्या सागरला (म्हणजेच मीनाच्या नवऱ्याला). जे माझं आयुष्य बदलू शकलं असतं! एक डोनर आठ जणांचा जीव वाचवू शकते. आशा आहे की, प्रत्येकाला अवयवदानाचे महत्त्व समजलं असेल."
अवयव दान करण्याची प्रतिज्ञा
ती पुढे म्हणाली, "हे फक्त डोनर आणि प्राप्तकर्ते आणि डॉक्टर यांच्यासाठी नाही. याचा कुटुंबं, मित्र, सहकारी आणि ओळखीच्यांवर खूप परिणाम होतो. आज मी माझे अवयव दान करण्याची शपथ घेत आहे."
आपल्या दिवंगत पती विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करत, अभिनेत्रीने तिच्या पोस्टचा शेवट केला, "तुमचा वारसा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग. लव्ह मीना सागर," विद्यासागर यांना फुफ्फुसाच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्याची प्रकृती जूनच्या अखेरीस खालावली आणि 28 जून रोजी त्याचं निधन झालं.