"मी माझ्या खासगी...', अर्जून कपूरच्या 'मी सिंगल आहे' विधानावरुन मलायकाचा थेट नाव घेत टोला

Malaika Arora Reacts To Arjun Kapoor: अभिनेता अर्जून कपूरने मलायकाबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी मलायकाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तिने थेट अर्जून नाव घेत टोला लगावला आहे. ती काय म्हणालीय पाहूयात...

| Dec 31, 2024, 11:07 AM IST
1/11

arjunkapoorandmalaikaarora

अभिनेत्री मलायका अरोरा पहिल्यांदाच अर्जूनबरोबरच्या ब्रेकअपवर इतक्या स्पष्टपणे बोलली आहे. तिने नक्की काय म्हटलंय पाहूयात...

2/11

arjunkapoorandmalaikaarora

मलायका अरोराने अभिनेता अर्जून कपूरबरोबर ब्रेकअप झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.  

3/11

arjunkapoorandmalaikaarora

ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्जूनने, 'मी सिंगल आहे,' असं एका कार्यक्रमात म्हटलं होतं. यानंतर अर्जून आणि मलायकाचं नातं संपुष्टात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या.   

4/11

arjunkapoorandmalaikaarora

पापाराझींच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना ऑक्टोबरमध्ये अर्जूनने, "नाही, आता मी सिंगल आहे," असं विधान केलेलं.   

5/11

arjunkapoorandmalaikaarora

आपण सिंगल असल्याचं जाहीर केल्यानंतर ऑक्टोबरपासून अर्जूनने कोणतंही विधान केलंलं नाही. मात्र आता यावर मलायकाने भाष्य केलं आहे.   

6/11

arjunkapoorandmalaikaarora

मलायकाने अर्जूनच्या या विधानाचा समाचार घेताना आपण खासगी आयुष्य हे खासगी ठेवतो आणि सार्वजनिक ठिकाणी त्यावर विधानं करत नाही, असं म्हणत खोचक विधान केलं आहे.  

7/11

arjunkapoorandmalaikaarora

मलायकाने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जूनने सार्वजनिकपणे केलेल्या विधानावर भाष्य केलं. "मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल कधीच सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. जे काही अर्जून बोलला आहे तो त्याचा हक्क आहे," असं मलायकाने म्हटलंय.

8/11

arjunkapoorandmalaikaarora

अर्जून आणि मलायका 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हे प्रेमप्रकरण सुरु होतं.  

9/11

arjunkapoorandmalaikaarora

2019 मध्ये अर्जून आणि मलायकाने इन्स्टाग्रामवरुन आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. या दोघांनी आम्ही आमच्या नात्यावर उघडपणे बोलू शकतो असं म्हटलेलं. त्यानंतर अर्जूनला अनेकदा लग्न कधी असे प्रश्न विचारण्यात आलेले. 

10/11

arjunkapoorandmalaikaarora

मात्र याचवर्षी अर्जून आणि मलायकाने एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकल्याने दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झालेली.   

11/11

arjunkapoorandmalaikaarora

खरोखरच ब्रेकअप झाल्याच्या वृत्तावर आधी अर्जूनने शिक्कामोर्तब केलं आणि आता मलायकाने त्याला दुजोरा दिला आहे.