मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या चित्रपट किंवा एकंदरच अभिनय कारकिर्दीशिवाय इतर अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. अशा कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री पूजा भट्ट. हे एक असं नाव आहे, ज्याभोवती सातत्यानं चर्चेची वलयं पाहायला मिळाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा भट्ट हिनं वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून मद्याचा आधार घेतला होता. अतिशय वाईट पद्धतीनं ती या व्यसनाच्या आहारी गेली होती. 


मद्यपानाच्या आहारी गेलल्या पुजाला तिच्या या व्यसनामुळं मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचावं लागलं होतं. पण, वडील महेश भट्ट यांच्यामुळं तिनं पुढे दारुच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. 


सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिनं ही बाब सर्वांपर्यंत आणली आहे. 


ट्विटरवर एका पेटत्या मेणबत्तीचा फोटो पोस्ट करत तिनं याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्याकडून मलाच वाढदिवसाच्या शुभेच्छा...सोबर असण्याचं हे पाचवं वर्ष... कृतज्ञ, विनम्र आणि स्वतंत्र भावना...'


पूजाची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली. 


2016 मध्ये पुजानं दारुपासून दूर राहणं पसंत केलं होतं. याच दिवशी आपला पुनर्जन्म झाला असं ती मानते. 


वयाच्या 16 व्या वर्षापासून ते 45 व्या वर्षापर्यंत पुजानं स्वत:ला मद्याच्या आहारी लोटलं होतं. 


पण, याच नशेनं आपल्याला मृत्यूच्या दरीपर्यंत आणून सोडलं आहे आणि असंच सुरु राहिलं, तर आपण फार काळ जगू शकणार नाही याची जाणिव तिला झाली. 


तिच्या या निर्णयामध्ये महेश भट्ट यांची महत्त्वाची भूमिका होती. माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वरही प्रेम करायला शिक, अशी अट त्यांनी पुजासमोर ठेवली. 



मद्याच्या नशेमुळं आपलं आपल्या कुटुंबीयांशी असणारं नातं तुटलं आहे याची जाणीव तिला झाली, एका जवळच्या व्यक्तीलाही तिनं याच व्यसनामुळं गमावलं होतं. 


जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत अखेर पुजानं मोठं पाऊल उचललं आणि स्वत:ला व्यसनाधीनतेच्या गर्त छायेतून बाहेर काढलं.