मुंबई : अभिनेत्री पुजा सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी फिटनेसमुळे तर कधी तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी तिचा सिनेमा 'दगडी चाळ २'मुळे चर्चेत आली आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलाकार सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच पुजा सावंत झी मराठीचा कार्यक्रम 'बस बाई बस'मध्ये पोहचली होती. नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडमध्ये  या अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीला आवडत्या अभिनेत्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता. यावेळी अभिनेत्रीने सांगितलं की, ''सिद्धार्थ मल्होत्रा माझं क्रश आहे. आवडेल मला तुझ्याशी लग्न करायला''. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.


मुंबईतच राहून मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ 'डॅडी'. अरुण गवळी यांच्या जिवनावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता 'दगडी चाळ 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


  बॉलिवूडमध्ये अनेक डॉनच्या जीवनावर फिल्म काढण्यात आले आहेच. आता मराठीत डॉन अरुण गवळी याच्यावर हा सिनेमा काढण्यात आला. बॉक्स ऑफिसवर 'दगडी चाळ' सिनेमाने तुफान गल्ला जमवल्यानंतर 'दगडी चाळ 2' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.