मुंबई : बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यानच प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्या आणि अनेक चर्चांना वाव मिळू लागला. निक आणि प्रियांका बरेच दिवस एकमेकांपासून दूर राहत होते. त्यातच आता म्हणे यांचा दुरावा आणखी वाढला आहे. 


आता तुम्ही म्हणाल यांच्यात दुरावा आला म्हणजे नेमकं काय झालं...? हो ना... पण, ज्या मार्गानं तुम्ही विचार करता तसं काहीच नाहीये. 


कारण निकपासून दूर राहणं मुळात प्रियांकाला शक्य होत नाही. पण, कामाच्या निमित्तानं मात्र तिला पतीपासून काहीसं दूर रहावं लागत आहे. 


याचबाबत सांगताना ही देसी गर्ल म्हणाली, 'हे वर्ष खरोखरच कठीण होतं. वर्षभर घरापासून दूर राहणं कठीणच होत होतं. विशेषत: अशा वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रवास करू शकत नाही.


मी एकटीच पडले होते.' प्रियांका आणि निकमधला दुरावा संपत आला तरीही त्यांना आता कोरोनाच्या नियमावलीनुसार क्वारंटाईन होण्यासाठी वेगळं रहावं लागणार आहे. 


म्हणजे एका अर्थी दुराव्यात भरच. कोरोना काळात एकमेकांपासून दूर राहणं कठीण असलं तरीही एकमेकांशी संवाद साधत, एकमेकांना प्राधान्य आणि शक्य तितका वेळ देत आम्ही प्रसंग निभावून नेले, असं प्रियांकानं स्पष्ट केलं.


दोघंहीजण करिअरला प्राधान्य देत असून, कोणाच्याही जीवनात डोकावत नसल्याचं तिनं सांगितलं. निकही प्रचंड मेहनती असल्याचं म्हणत त्यानंही आपल्याला मोलाची साथ दिल्याचं प्रियांकानं सांगितलं. तिची आणि निकची हीच गोष्ट अनेक जोड्यांना आदर्श देऊन जात आहे.