मुंबई : देशात रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णसंख्या वाढत आहे, यंत्रणा मात्र कमी पडत आहे. रूग्णालयात  आयसीयू रूम्स नाहीत. सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता, एकत्र मृतदेहांना अग्नी देण्यात येत आहे. भारताची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा कठीण प्रसंगी अनेक राष्ट्र भारताच्या मदतीला धावून आले आहेत. तर दुसरीकडे सेलिब्रिटी देखील त्यांच्या परीने  शक्य तेवढी मदत करत आहेत. देश अशा बिकट परिस्थितीतून जात असताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने मदतीची  हाक दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाने एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'मी सध्या लंडंनमध्ये आहे. भारताची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. मी माझ्या कुटुंबाकडून आणि मित्र परिवाराकडून ऐकत आहे. रूग्णालयात बेड्स नाहीत, आयसीयू रूम्स नाही, एकत्र मृतदेहांना अग्नी देण्यात येत आहे.'



ती पुढे म्हणाली, आपल्याला जागतिक स्तरावर चिंता करण्याची गरज आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक नारगिक सुरक्षित नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे मदत करा. मदतीसाठी पुढे या. सध्याच्या परिस्थितीत भारताला आपल्या सर्वांची गरज आहे. 


कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रियांकाने गिव्हइंडियासोबत एकत्र येत एका संस्थेची स्थापना केली आहे. 'भारत सध्या कोरोनाच्या  विळख्यात सापडला आहे. त्यामुळे तुम्हाला मदत करायची असेल तर नक्की करा.  मला 63 मिनियन लोक फॉल करतात. प्रत्येकाने 10 डॉलर दिले तरी मोठी रक्कम जमा होईल. ही मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल. 'असं देखील प्रियांका म्हणाली.