मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि वादग्रस्त दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) गेल्या काही दिवसांपासून #metoo प्रकरणामुळे चर्चेत आहे. साजिद खानवर गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अनेक अभिनेत्रींनी उघडपणे साजिदला विरोध केला आहे असून आता या यादीत भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हसीना राणी चॅटर्जीचं (Rani Chaterjee) नावही जोडण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातम्यांनुसार, अभिनेत्रीनं सांगितले की, साजिदनं तिच्यासोबतही चुकीचं काम केलं आहे. आता अशा परिस्थितीत साजिदला बिग बॉसच्या घरातून काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : प्रेग्नंट आलियाला सोडून रणबीर कोणासोबत करतोय रोमान्स, Video Viral


अभिनेत्रीनं सांगितलं की, साजिदनं तिला त्याच्या एका चित्रपटासाठी आयटम साँग ऑफर केलं होतं. त्यानंतर चित्रपट निर्मात्यानं राणी चॅटर्जीचीही भेट घेतली होती. यावेळी राणी म्हणाली की, 'बिग बॉस' पाहिल्यानंतर तिला खूप राग येत आहे. साजिद खानला शोमध्ये पाहून मला धक्काबसला. MeToo दरम्यान त्याचा खरा चेहरा संपूर्ण जगाने पाहिला. पण आता त्याला 'बिग बॉस'मध्ये पाहून माझ्या रक्ताला उकळी येते की तिथं त्याची प्रतिमा का स्वच्छ केली जात आहे.' (actress put allegations on sajid khan that he asked my breast size) 


हेही वाचा : नयनतारा आणि विग्नेशनं 6 वर्षांपूर्वी केलं लग्न, सरोगसी चौकशी दरम्यान मोठा खुलासा


राणीनं सांगितलं की, 'हिम्मतवाला' चित्रपटासाठी साजिदच्या टीमशी माझा संपर्क झाला होता. मला फोन आला की दिग्दर्शकाला माझ्याशी बोलायचं आहे. साजिदनं मला त्यांच्या घरी बोलावलं आणि सांगितलं की ही औपचारिक बैठक आहे, त्यामुळे कोणालाही सोबत आणू नको. बॉलिवूडचा एवढा मोठा दिग्दर्शक असल्याने मी त्याचं म्हणणं मान्य केलं. भेटीत त्यानं मला सांगितले की, 'धोखा-धोखा' या आयटम साँगसाठी मी तुला कास्ट करणार आहे. यामध्ये तुला छोटा लेहेंगा परिधान करावा लागेल, मला तुझे गुडघ्यापर्यंत पाय दाखव.'


हेही वाचा : ब्रेक मिळवण्यासाठी ... करावा लागतो 'या' गोष्टींचा सामना, तुषार कपूरचं धक्कादायक वक्तव्य


राणी चॅटर्जीनं सांगितलं की, त्याचा प्रश्न ऐकून मी घाबरले. त्यानंतर जेव्हा त्यानं 'तुझा स्तनाचा आकार सांग?', 'तुझा बॉयफ्रेंड आहे का?', 'तू किती वेळा सेक्स करते?' मग मी त्याला म्हणाले कि तू ज्या गोष्टी विचारत आहेस, त्यानं मला अस्वस्थ केले आहे. त्यानं मला घाणेरड्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आधी मी हे सर्व बोलले नाही कारण मला वाटायचे की मला काम मिळणे कुठेतरी थांबू शकते.'