मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीस सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारानं काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गूड न्यूज दिली. मात्र, नयनताराला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या चार महिन्यांनंतर नयनतारा आणि विघ्नेश (Nayanthara-Vignesh Shivan) आई-वडील झाले. कारण त्यांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारला होता. ज्यावर भारतात जानेवारी 2022 पासून बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारनं चौकशी केली असता या दाम्पत्याने सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
हेही वाचा : ब्रेक मिळवण्यासाठी ... करावा लागतो 'या' गोष्टींचा सामना, तुषार कपूरचं धक्कादायक वक्तव्य
नयनतारा आणि विघ्नेश शिवन या सेलिब्रिटी कपलनं तामिळनाडू आरोग्य विभागाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी सांगितले की, त्यांचं लग्न 6 वर्षांपूर्वी नोंदणीकृत झाले होते. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री मा सुब्रमण्यम यांनी सरोगसी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या जोडप्याची चौकशी करण्याची मागणी केली तेव्हा ही बाब समोर आली.
सध्याच्या कायद्यांनुसार, कपलला सरोगसीचा अवलंब तेव्हाच करता येतो जेव्हा त्यांना पाच वर्षांपर्यंत मूल होत नसेल. याविषयी तपास केल्यानंतर ही माहिती समोर आली की नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी लग्नाच्या नोंदणीच्या कागदासह प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यावरून त्यांचे 6 वर्षांपूर्वी लग्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Case Couple Says To Health Department Their Marriage Was Registered 6 Years Ago)
सध्या आरोग्य संचालकांनी स्थापन केलेली ही टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. चेन्नईतील ज्या हॉस्पिटलमध्ये मुलाचा जन्म झाला होता, त्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच दुबईत राहणाऱ्या एका मल्याळी महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्याचेही समोर आले आहे.
9 ऑक्टोबर रोजी विघ्नेशनं ट्विटरवर मुलांचे अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यानं चाहत्यांना जुळे मुलगे झाल्याची आनंदाची दिली. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले की, 'नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. आपल्या पूर्वजांच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वाद या दोन जुळ्या मुलांच्या रूपाने मिळाली आहेत. आता तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. उईर आणि उलगम. आयुष्य अधिक सुंदर दिसत आहे. यांच्या जन्मानं सगळ्यांना आनंद झाला पण तपासामुळे सगळेच नाराज झाले. मात्र, आता प्रतिज्ञापत्र दिल्यास प्रकरण निकाली निघू शकते.