मुंबईः राखी सावंत अनेकदा तिच्या नात्यांमुळे चर्चेत असते. गेल्या वर्षी तिने आपल्या पतीशी संपूर्ण जगाची ओळख करून दिली होती, परंतु यावर्षी राखीने पतीपासून वेगळं होण्याची घोषणा केली. अलीकडेच राखीने पुन्हा दावा केला की तिच्या आयुष्यात कोणीतरी खास आलं आहे, पण आता ही लव्ह स्टोरीही अडचणीत सापडली आहे. 



राखी तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे खूप चर्चेत आहे, तिने अलीकडेच खुलासा केला आहे की, ती आदिल खान दुर्रानी नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. जो तिच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. राखी आणि आदिल आत्तापर्यंत अनेकवेळा सोबत दिसले आहे, मात्र आता तिची लव्ह लाईफही धोक्यात आली आहे.



राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला एका मुलीने फोन करून ती आदिलची मैत्रीण असल्याचं सांगितलं. रोशिना देलावरी असं त्या मुलीचं नाव असल्याचं राखीनं सांगितलं


त्या तरुणीने राखीला सांगितलं की, ती ज्या व्यक्तीला तिचा बॉयफ्रेंड सांगत आहे, तो गेल्या चार वर्षांपासून तिच्यावर प्रेम करत आहे. रोशिनाने राखीला त्याच्यापासून दूर राहण्यासही सांगितलं. राखीने जेव्हा आदिलला हे सर्व सांगितलं तेव्हा आदिलने ती मुलगी त्याची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगितले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)


याबाबत राखी पुढे म्हणाली की, रोशिनाच्या बोलण्याला कोणताही अर्थ नाही. आदिल फक्त माझा आहे. ती त्याची  एक्स गर्लफ्रेंड आहे. आदिल आणि मी लग्न करणार आहोत.