बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई... `ही` लोकप्रिय अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
परंतु आता बॉलिवूडमध्ये अजून एका कपलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
Rakul Preet Wedding: सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती लग्नसराईची. सिद्धार्थ मल्होत्रा आणि किराया अडवाणी (Siddharth Malhotra and Kiara Advani) यांच्या लग्नांच्या चर्चांना सध्या जोरदार उधाण आलं आहे. त्यातून नुकतेच रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला होता. (actress rakul preet singh marriage jackky was accused for misbehaving with a model)
परंतु आता बॉलिवूडमध्ये अजून एका कपलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये अजून एक कपल लग्नबंधनात अडकणार का याची चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 2023 मध्ये दोघेही सात फेर्या घेतली असं बोललं जात आहे. याबाबत रकूलच्या भावानंच हिंट दिली आहे.
हेही वाचा - ऑस्कर विजेत्या दिग्गज अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अनेकदा एकत्र दिसतात. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर झळकतही होत्या. हे दोघे त्यांच्या नात्याला नवीन नाव कधी देणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना रकूलच्या भावानं हा खुलासा केला आहे.
हेही वाचा - 'मी सुंदर नाही पण...' बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य
रकुलचा भाऊ अमनने सांगितले की, रकुलने जॅकीसोबत काही प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्या दोघांना एकमेकांसोबत लग्नही करायचे आहे. सध्या लग्नाची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, पण असं काही निश्चितच ठरल्यावर रकुल स्वत: सर्वांना याबद्दल सांगेल. सध्या जॅकीकडे मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि रकुलही बिझी आहे, त्यामुळे दोघेही विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेतील, असा खुलासा अमननं केला आहे.
हेही वाचा - करीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल
रकुल प्रीतही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. दोघेही खूप क्यूट कपल आहेत आणि एकमेकांना खूप आवडतात. जॅकी भगनानी हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते वासू भगनानीचा मुलगा आहे. यापुर्वी एका मॉडेलचा लैंगिक छळ केल्याबद्दल जॅकीवर आरोप करण्यात आले होते.