मुंबई: चित्रपट वर्तुळात बायोपिकला प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहता बऱ्याच काळापासून काही निर्मात्या, दिग्दर्शकांनी याच धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य दिलं. याच बायोपिकच्या यादीत आता नव्याने एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे एनटीआर म्हणजेच एन.टी. रामराव यांच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटातील एका पात्राच्या फर्स्ट लूकवरुन पडदा उचलण्यात आला आहे. 


'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचा बायोपिक कुठवर आला आहे याचं ठाऊक नाही. पण, तोपर्यंत एनटीआर यांच्या बायोपिकमध्ये मात्र त्यांची व्यक्तीरेखा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 


श्रीदेवी यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिची निवड झाली  असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातील फर्स्ट लूक तिने सर्वांच्याच भेटीला आणला आहे. 


'कथानायकुडू' Kathanayakudu असं या चित्रपटाचं नाव असून, त्यातील रकुलप्रीतचा लूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. 


प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांच्या तरुणपणीची व्य़क्तीरेखा रकुल साकारत असल्यामुळे तिच्या लूकमधून स्पष्ट होत आहे. 


मुख्य म्हणजे 'श्री'चा लूक साकारताना त्यात बरेच बारकावे टीपण्यात आल्याचंही लक्षात येतंय. 



हिंद चित्रपटविश्वात पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीदेवी यांची व्यक्तीरेखा साकारणं ही आपल्यासाठी आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं खुद्द रकुलप्रीत म्हणाली होती. 


'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवी आपल्या सर्वात आवडत्या अभिनेत्री असून या चित्रपटाच्या निमित्ताने मी त्यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन अशी आशाही तिने व्यक्त केली होती.