मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. सोशल मीडियावर रश्मिका कायम सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिने तिच्या सोशल मीडिया अकांऊन्ट एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. आता नुकतीच रश्मिकाची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. ज्यामध्ये रश्मिका किस करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवरुन काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ती गोड स्माईल देताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत ती किस करताना दिसतेय. तिचा हा फोटो अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. या फोटोला तिने Absolutely RANDOM..!! But… Mwahhh…! असं कॅप्शन दिलं आहे. अनेकानी तिच्या या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय की, National crush, तर एकाने म्हटलंय, आय लव्ह यू रश्मिका, तर अजून एकाने रश्मिकाच्या फोटोवर कमेंट करत लिहीलंय की, या गोड स्माईलने माझा आजचा दिवस बनवला आहे. तर अजून एकाने तिला खूप  क्यूट आहेस तु असं म्हटलंय. तर अनेकांनी रश्मिकाच्या या फोटोवर हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केल्या आहेत. रश्मिकाचा हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  


नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत असते. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिचं नाव अनेकदा जोडले जातं. त्यांच्या डेटिंगच्या बातम्या अनेकदा मीडियात आगीसारखी पसरतात आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.



अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रश्मिका मंदान्ना  रणबीर कपूर स्टारर 'एनिमल' मध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 11 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर आणि तृप्ती दिमरी सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे.