Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाने सातत्याने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाच्या आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजूनही चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटामधील रश्मिकाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मधील रश्मिकाचा अभिनय पाहून तिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटात सलमान खानसोबत काम करत आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, सध्या रश्मिका मंदानामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळे अभिनेत्री रश्मिका मंदानाने कामातून ब्रेक घेतला आहे.


रश्मिका मंदानाला दुखापत


साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, 'रश्मिका मंदानाला नुकतीच जिममध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्रीने थोडा ब्रेक घेतला आहे. ती सध्या विश्रांती घेत आहे. मात्र, जिममध्ये झालेल्या दुखापतीमुळे अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. अभिनेत्रीची तब्येत सध्या ठीक असल्याचे सांगितले जात आहे. आशा आहे की ती लवकरच सेटवर काम सुरू करेल.



डोक्टरांनी दिला विश्रांती सल्ला 


अभिनेत्री रश्मिका मंदानाला कामावर परतण्यापूर्वी पूर्णपणे बरे होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यासाठी तिला विश्रांती घ्यावी लागेल. अभिनेत्रीच्या तब्येतीच्या अपडेट्सवरून हे स्पष्ट झाले आहे की ती लवकरच बरी होईल. सलमान खानसोबत ती 'सिकंदर' चित्रपटात ॲक्शन करताना दिसणार आहे. रश्मिकाचे नाव फिटनेस फ्रीक कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करते. नेहमी सोशल मीडियावर रश्मिका तिचे जिममधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 


रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटानंतर सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, जिममधील दुखापतीमुळे सध्या तिने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवण्यात आले आहे.