Ridhi Dogra Shares Shocking Experience : बिर्यानी... सुगंधी आणि तितकाच चवीष्ट तांदुळ, मांसाला विविध मसाले लावून वाढवलेली त्याची लज्जत आणि या दोन्ही गोष्टी एकत्र करून बनवलेला एक अफलातून पदार्थ. तसं पाहिलं तर, बिर्यानीची पाळंमुळं बऱ्याच ठिकाणांवर पसरली आहेत. विविध प्रकारच्या बिर्यानी आणि त्या तयार करण्याची पद्धत पाहता अनेकांसाठीच हा पदार्थ प्रचंड आवडीचा. पण, काही प्रसंग आणि घटनांमुळे काहींनी हा पदार्थच खाणं सोडून दिलं. असं घडलं तरी काय, की चक्क लोकांनी बिर्यानी खाणं सोडलं? 


अभिनेत्री रिद्धी डोगरानं सांगितला भयावह किस्सा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रिद्धी डोगरा (ridhi dogra ), तिच्या आगामी 'लकड़बग्घा' (Lakadbaggha) या चित्रपटामुळं बरीच चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावर कमालीची लोकप्रियता मिळवल्यानंतर रिद्धीनं आता तिचा मोर्चा रुपेरी पडद्याकडे वळवला आहे. 'लकड़बग्घा' या चित्रपटातून ती एक चौकटीबाहेरचं पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून जगभरात होणाऱ्या (Animal Trafficing) पशुहिंसेविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. 


बिर्यानीमध्ये कुत्र्याचं मांस? 


हल्लीच या चित्रपटाविषयी सांगताना रिद्धीनं एका मुलाखतीमध्ये आपल्या वाचनात आलेल्या धक्कादायक प्रसंगाविषयी तिनं सांगितलं. काही वर्षांपूर्वीच (Kolkata) कोलकाता येथे बिर्यानीमध्ये (Dog Meat in biryani) कुत्र्याचं मांस वापरण्यात आल्याची बातमी वाचली आणि धक्काच बसल्याचं ती म्हणाली. 2018 मध्ये (Fast Food) फास्ट फूडमध्ये कुत्रे आणि मांजरींच्या मांसाचा वापर झाल्याचं वाटलं आणि माझ्या पायांखालची जमीन सरकल्याचं तिनं सांगितलं. या संपूर्ण घटनेनंच रिद्धीला धक्का दिला होता. 


'लकड़बग्घा' मध्ये नेमकं काय साकारण्यात आलं आहे? 


आगामी चित्रपटाच्या निमित्तानं अनेक अनुभव आल्याचं सांगत या प्रोजेक्टच्या निमित्तानं देशातील प्राण्यांच्या तस्करीविषी प्रचंड माहिती मिळाल्याचं रिद्धीनं स्पष्ट केलं. आजुबाजूला पशूंच्या बाबतीत इतकी क्रूरता होत असताना आपल्याला मात्र याची तसुभरही कल्पना नसते असं सांगताना रिद्धीनं आपण खूप काही शिकल्याची बाब अधोरेखित केली. 



पाहा : Special Report | आता अंतराळात मिळणार शाही बिर्याणी मेन्यू कार्ड तुम्ही वाचले का?


कधी रिलीज होणार रिद्धीचा हा चित्रपट? 


बऱ्याच मालिका आणि वेब सीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी रिद्धी आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लकड़बग्घा' या आगामी चित्रपटातून ती एक महत्त्वाचा मुद्दाही हाताळताना दिसणार आहे. 13 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.