Gauri visarjan Muhurat 2024 : गौरी विसर्जन करताना 'या' चुका करु नका! 'हे' विधी नक्की करा, अन्यथा...

Gauri visarjan 2024 : माहेरवाशिणीचं स्वागत, मग तिचा पाहुणाचार अतिशय प्रेमाने आणि विधीवत केल्यानंतर आज तिला निरोप देण्याची वेळ आली आहे. गौराईला निरोप देताना 'पुनरागमनायच' हे म्हणायला विसरू नका. त्यासोबत विसर्जन मुहूर्त आणि कुठल्या गोष्टी टाळ्यावात ते जाणून घ्या. 

Sep 12, 2024, 12:24 PM IST
1/7

आपल्या गौराईचं (महालक्ष्म्या) विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी घरोघरी लगबग सुरु आहे. शुभ मुहूर्तावर आणि काही गोष्टींची काळजी घेतल्यास विसर्जन नक्की चांगल पार पडेल. गौरी विसर्जन विधी जाणून घ्या.  

2/7

गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देताना घरातील आणि अस्वच्छ कपड्यांवर देऊ नका. 

3/7

गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ द्यायला विसरू नका. 

4/7

गौरीला निरोप देताना सौभाग्याच्या थाळीचे वाण 5 महिलांना द्यायला विसरू नका. 

5/7

गौराईला दही भाताचा नैवेद्य दाखवायला विसरु नका आणि सोबतच विडा नक्की ठेवा. 

6/7

देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातलीच थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवायला घेऊन यायला विसरु नका. 

7/7

गौरी मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या, सोन्या-चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढायला विसरु नका.