Rupali Ganguly Touch Husband Feet : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेचा हिंदी रिमेक असलेली अनुपमा ही मालिका तितकीच लोकप्रिय आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीतही सर्वोच्च स्थानी आहे. या मालिकेत अनुपमा ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गागुंली साकारत आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली गांगुली यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रुपाली ही तिच्या नवऱ्याच्या पाया पडताना दिसत होते. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात येत होते. आता यावर तिने सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी रुपाली गांगुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रुपाली ही एअरपोर्टच्या आत जाण्यापूर्वी नवऱ्याच्या पाया पडली. तिला पाहून तिचा मुलगाही वडिलांच्या पाया पडताना दिसला. रुपालीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. तर काहींनी तिला ट्रोलही केले होते. यावर काहींनी तिला मालिकेत महिला सशक्तीकरणाचे धडे देणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र वेगळंच वागत आहे, अशी कमेंट केली होती. तर काहींनी तिला कॅमेऱ्यासमोर ड्रामा करत असल्याचे म्हटले होते.


"त्यामुळेच मी पाया पडते"


आता रुपालीने यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. रुपालीने एका मीडिया पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने नवऱ्याचे पाया पडण्याचे कारण सांगितले आहे. "माझे माझ्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी मला प्रत्येक कठीण प्रसंगी साथ दिली आहे. त्यांनी मला कधीही स्वतःची ओळख निर्माण करण्यापासून रोखले नाही. त्याउलट ते मला माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतात. अश्विनबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. तो माझ्यासाठी खूप काही करतो. मला तर वाटते की त्याच्यासमोर मी काहीही करत नाही. मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो, त्यामुळेच मी पाया पडते", असे रुपाली गांगुलीने म्हटले. 


त्यापुढे ती म्हणाली, "जरी माझे माझ्या पतीसोबत भांडण झाले तरीही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घराबाहेर पडते, तेव्हाही मी त्याच्या पाया पडते. कारण तो आमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, अशा माझा विश्वास आहे आणि त्याच्या पायांना स्पर्श करणे हे चांगले संस्कार आहेत. मी जेव्हा माझ्या आई-वडिलांसोबत राहायची तेव्हा घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी त्याच्या पायांना स्पर्श करायचे. मला यात काही चुकीचे वाटत नाही." 



दरम्यान रुपाली गांगुली ही 'अनुपमा' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने या मालिकेत अनुपमा हे पात्र साकारले आहे. रुपाली ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिचे लाखो चाहते आहेत. रुपाली गांगुलीने 'साहेब' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर 'सुकन्या' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री केली. 'साराभाई VS साराभाई' या मालिकेत तिने मनिषा हे पात्र साकारले होते. यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. रुपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुली हे 70 ते 80 च्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी कोरा कागज, तपस्या सारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाले आहेत.