मुंबई : आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा आहेत, त्या जशा चांगल्या आहेत तशाच काही कुप्रथाही आहेतच. ज्या स्त्रियांवर अन्याय करतात केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यात भरडल्या जातात. मुलींची स्वप्न धुळीला मिळतात. अशाच एका कुप्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक नवा संघर्ष. या संघर्षातून तिचं अपेक्षित ध्येय साध्य होतं का? या धीरोदत्त संघर्षाची कथा सांगणारा निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.  यानिमीत्ताने या सिनेमाच्या टीमने झी 24तासच्या न्यूजरुममध्ये हजेरी लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला दिलेल्या मुलाखतीत  अभिनेत्री ऋतुजा बागवेला प्रश्न विचारण्यात आला की, सध्या मराठी सिनेमांना न  मिळणाऱ्या थिएटरवर तुझं काय मत आहे. या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्री ऋतुजा म्हणाली की, एकतर हिंदी इंडस्ट्री एवढी मोठी आहे आणि त्यांचं स्केल बजेटींगचं वैगरे इतकं आहे मार्केटिंगचं सुद्धा त्यामुळे त्यांच्याशी खरंतर फायनांशिअली खरंतर शक्य नाहीये. कोन्टेंवर यायचं झालं तर मराठीही तितकाच उत्तम आहे. खरंतर मराठीत आता खूप चांगले सिनेमा आहेत. हिंदेसिनेमाच्या दृष्टीकोनातून पहायचं झालं तर. आता अॅनिमलबद्दल बोलायचं झालं तर मला रणबीर कपूरची मी फॅन असल्याने अॅनिमल मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला. 


तरी त्यातला मला कॉन्टेट मला नाही आवडला. आणि एकेठिकाणी अॅनिमलसारखे सिनेमा खूप चाचलेत जिथे फिजीकल अत्याचार होतोय  स्त्रियांवर आणि एकीकडे सोंग्यासारखा मराठी सिनेमा जो लढतोय की, त्यांच्यावर अत्याचार होवू नये. जरी मुद्दा हा चांगला असला तरिही चालतोय आज तो. आणि नाही आपण फायनाशली लढू शकत त्या मोठ्या इंडस्ट्रीशी. राहिला प्रश्न थिएटर न मिळण्याचा मिळालेल्या थिएटरचा प्राईम टाईम मिळत नाही. कधी दुपारचा असतो.  मग आपण प्रेक्षकांना म्हणतो की,  तुम्ही येत नाही. ते कसे येतील जर प्राईम टाईमवर नसेल शो तर. जॉबवर जाणारा माणूस १.३० वाजता कसा जाईल शो पहायला. त्यामुळे प्रेक्षकांना दोष देऊन काही फायदा नाही. ही सगळी सिस्टीमची गडबड आहे. कुठेतरी कोणत्यातरी मोठ्या माणसांनी त्याच्यात लक्ष घालून ती निट केली पाहिजे असं मला वाटतं.



तिचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.  ‘सोंग्या’ हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. कौमार्य चाचणीवर बोलता होणारा हा सिनेमा आहे.