पुणे : अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बोल्ड अंदाजामूळे नेहमीच चर्चेत असते. सिनेमातील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ती आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असते. पण हे करणं वाटत तितक सोप नसत.


'वजनदार' लूक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन कुंडलकर यांच्या 'वजनदार' सिनेमात तिचा 'वजनदार' लूक पाहायला मिळाला. पण पुन्हा वजनाकडे लक्ष देणं तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं.


यामागचा फिटनेस फंडा सईने सर्वांसमोर शेअर केला आहे. 
  
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ कार्यक्रमात सईने सर्वांशी दिलखुलास गप्पा मारल्या.


नियमित व्यायाम आणि जॉगिंग


यावेळी तिने आपला फिटनेसचे रहस्य उलगडले.


'वजन कमी करणे हे माझ्यासाठी सोपं नव्हत.


आम्हाला सतत प्रेक्षकांसमोर यायच असतं. कामाच्या वेळा संभाळत वजनाकडे लक्ष देणं ही तारेवरची कसरत असते.


आपण थकून जाऊ नये यासाठी मी वजनाकडे लक्ष देते' असे तिने सांगितले. नियमित व्यायाम आणि जॉगिंग करुन मी वजन कमी केल्याचे सईने यावेळी सांगितले. 
  
या कार्यक्रमात अभिनेता शरद केळकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते.