मुंबई : अभिनय क्षेत्रात फार कमी वेळात फार जास्त प्रसिद्धी मिळवणाऱ्या युवा कलाकारांमध्ये समंथा रुथ प्रभू हिच्या नावाचा समावेश होतो. समंथानं विविध धाटणीचे चित्रपट आणि काही वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. इतकंच काय, तर तिनं बऱ्याच ब्रँडच्या जाहिरातीही केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुष्पा' (Pushpa)मधील 'ऊं अंटावा' या गाण्यानं तर तिला लोकप्रितेच्या अशा टप्प्यावर आणलं जिथून मागे वळूण पाहणंही चूक. 


अशी ही समंथा कारकिर्दीत उंची गाठत असतानाच तिच्या खासगी आयुष्यात मात्र मोठं वादळ आलेलं. 


अभिनेता नागा चैतन्य याच्याशी असणारं वैवाहिक नातं तुटल्यामुळं समंथा सध्या यातूनही सावरत आहे. ती बरीच पुढे आली असली तरीही काही गोष्टी मात्र तिला आठवणींच्याच गावात नेत असाव्यात. (samantha ruth prabhu naga chaitanya)


समंथाला नाजा चैतन्यशी जोडून ठेवणारी गोष्ट म्हणजे तिच्या शरीरावरील टॅट्टू. 


समंथाच्या शरीरावरचे तीन टॅट्टू फारच अर्थपूर्ण आहेत. तिच्या मनगटावर दोन बाण असणारा एक टॅट्टू आहे. स्वत:ची ओळख स्वत: असा याचा अर्थ होतो. 


समंथाच्या मानेवर मागच्या बाजूला पाठीचा कणा सुरु होतो तिथेच एक टॅट्टू आहे. याचं नातं तिच्या नागा चैतन्यसोबतच्या पहिल्या चित्रपटाशी आहे. 


 'Maaya Chesave' असं त्या चित्रपटाचं नाव. YMC अशी तीन अक्षरं यामध्ये कोरली गेली आहेत. 


हे तिच्यासाठी फार खास आहे, कारण याच चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ती नागा चैतन्यला पहिल्यांदा भेटली होती. 


समंथाचा तिसरा टॅट्टू तिच्या कमरेच्या बाजूला अगदी बरच्या दिशेला आहे. ज्यामध्ये नागा चैतन्यचं टोपणनाव, 'चै' कोरलं गेलं आहे. 



समंथा आणि नागा चैतन्य या दोघांचीही केमिस्ट्री हेवा वाटण्याजोगीच होती. पण, एकाएकी नात्याची समीकरणं बदलली आणि 2 ऑक्टोबर 2021 ला त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.