मुबईः समंथा सध्या आयुष्याच्या एका अद्भुत टप्प्यात आहे. समंथाकडे अनेक मोठे प्रकल्प आहेत आणि आता समंथा लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


साउथ अभिनेत्री 'सामंथा रुथ प्रभू' जी बिग बजेट चित्रपट 'कथुवाकुला रेंडू कादल' मध्ये दिसणार आहे, तसंच आणखी एका नवीन चित्रपटातही सामंथा दिसणार असल्याची माहिती आहे. 'माजिली' अभिनेत्री समंथा हिने आणखी एक मोठा चित्रपट साइन केल्याचं सांगितले जात आहे, ज्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.



समांथाने एका तरुण चित्रपट निर्मात्याद्वारे दिग्दर्शित केलेला चित्रपट साइन केला आहे. याशिवाय तिचा आगामी पौराणिक प्रेम गाथा 'शकुंतलम'ही मोठ्या दिमाखात लॉन्च होणार आहे. अशा परिस्थितीत आता चाहते समंथाच्या या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.


तूर्तास, निर्मात्यांनी अद्याप लॉन्च होणार्‍या चित्रपटाची माहिती गुप्त ठेवली आहे. या सर्वांशिवाय अभिनेत्री समंथाने प्राइम व्हिडिओसोबत वेब सीरिजचा करारही केला आहे. दुसरीकडे, हरी शंकर आणि हरीश नारायण या जोडीने दिग्दर्शित केलेल्या 'यशोदा'मध्ये सामंथा एक असामान्य भूमिका साकारणार आहे.



सध्या घटस्फोटानंतर समंथा तिच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे. यासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.