Ragini MMS 2 : बॉलिवूडमध्ये (Bollywood) जेवढी चमकदमक दिसतं तेवढीच तिची काळी बाजू पण आहे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना (Famous actresses) या काळा बाजूला समोरे जावं लागलं आहे. त्यामुळे आजही अनेक घरातून मुलींना या इंडस्ट्रीमध्ये (Industry) पाठवायला घाबरतात. या फिल्मी दुनियेत अभिनेत्रींना काम करणं खूप अवघड असल्याचं अनेक जणांनी सांगितलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री Ragini MMS 2 फेम संध्या मृदुल (sandhya mridul) हिने नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संध्या मृदुल हिने तिच्या आयुष्यातील सिनेसृष्टीतील वाईट अनुभवांचा खुलासा केला, ते ऐकून कोणालाही राग येईल. संध्या मृदुलने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला तिला बॉडी शेमिंगमधून (Body shaming) जावं लागलं होतं. हद्द तेव्हा झाली जेव्हा संध्या मृदुलला बूब्स जॉब (boobs job) करण्याचा सल्ला मिळू लागला. (actress sandhya mridul wearing breast pad and Body shaming ragini mms 2 NM)


संध्याने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितलं की, लोक तिला म्हणायचे, 'यू लुक वैम्पिश, यार आपकी बॉडी नहीं है, थोड़ी और सेक्सी दिखो, आप ये लगा लो.' तिला तिच्या बॉडीबद्दल अशा अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. तर संध्या मृदुलने चित्रपटसृष्टीतील अनेक काळ्या गुपितांबद्दलही सांगितलं आहे, ज्याचा सामना अनेकदा संघर्ष करणाऱ्या अभिनेत्रींना करावा लागतो.


संध्या मृदुलला टोमणा मारला जातो


47 वर्षीय संध्या मृदुलने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, एका चित्रपट निर्मात्याने तिला चित्रपटात कास्ट करण्यासाठी तिच्या स्तनाच्या आकारावर आक्षेप घेतला. ती म्हणाली, 'मला असं वाटतं की मी तुझ्यासाठी माझं शरीर बदलणार नाही, उद्या तू येऊन म्हणशील की नाक बदलून. तर हे मी नाही करणार. मला कोणीतरी सांगितलं 'तुझ्याकडे बुब्स नाहीत, सॉरी'. मला बोलावले आहे! एका चित्रपटासाठी मला 'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो पण तुझ्या पात्रासाठी आम्हाला मोठे स्तन हवेत' असे सांगितले होतं. मी त्याला म्हणाले की, ठीक आहे मला ब्रेस्ट पॅड द्या.


ब्रेस्ट पॅड घालून केलेलं काम


तिच्या पोस्टमध्ये, अभिनेत्री संध्या मृदुलने निःसंकोचपणे कबूल केले की तिने 'पेज 3' (Page 3) (2005) आणि 'रागिनी एमएमएस 2'(Ragini MMS 2 ) (2014) साठी ब्रेस्ट पॅड (Breast pad) घातले होते. अभिनेत्री म्हणाली, 'पेज 3' काही सीनसाठी मी (ब्रेस्ट) पॅड घातले होते. संध्या मृदुल पुढे हे सांगितलं की, " तू बाहेर जायला तयार नाही', 'चला बिअर प्याज' अशा अनेक गोष्टी तिला ऐकाव्या लागल्यात."



आर्थिक संकटाचा सामना 


अभिनेत्री पुढे म्हणाली, 'अनेक कारणांमुळे मी जास्त काम केलं नाही. पैशासाठी काम करू नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केलं आहेत. मी अशा टप्प्यांमधूनही गेली आहे जिथे माझी आर्थिक स्थिती अत्यंत गरीब होती, पण तरीही मी झुकले नाही. अभिनेत्री म्हणाली, तो काळ खरोखरच वाईट होता. मी स्वत:ला कमर्शियल साइडमध्ये कधी पाहिलं नाही, मला हवे तसं काम मिळतं नव्हतं.