मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांना घरात राहण्याच आवाहन करूनही लोकं घराबाहेर पडत आहेत. असंच लॉकडाऊनच्या काळात मध्यरात्री घराबाहेर पडणं एका अभिनेत्रीला महागात पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ अभिनेत्री शर्मिला मांडरेचा बंगलुरूत अपघात झाला असून यामध्ये ती जखमी झाली आहे. यामध्ये तिचा मित्र लोकेश वसंत देखील असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना एका स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, वसंत नगरच्या अंडरब्रिजजवळ हा मध्यरात्री तीन वाजता अपघात झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक व्यक्ती अचानक समोरून आला आणि त्याने आपण गाडी चालवत असल्याचा दावा केला. एवढंच नव्हे तर सतत यामध्ये चूक कुणाची नाही. मी गाडी चालवत असल्याच सांगत होता. 



मात्र तरी देखील पोलीस शर्मिलाकडे कोणता लॉकडाऊनचा पास होता का? याची कसून चौकशी करत आहेत. कोणत्या कारणामुळे तीने एवढ्या रात्री प्रवास केला याची देखील चौकशी करत आहे.