Whaaat? `या` लोकप्रिय सेलिब्रिटीला डेट करतेय शहनाज गिल?
सध्या शहजनाज तिच्या खासगी आयुष्यालाही केंद्रस्थानी ठेवताना दिसत आहे.
मुंबई : Bigg Boss 13 या रिअॅलिटी शोमधून प्रकारशोतात आलेल्या आणि पंजाबी चित्रपट जगतामध्ये कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलचा (shehnaaz gill) चाहता वर्ग बराच मोठा. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत असमणारी तिची खास मैत्री सर्वांनाच हेवा वाटण्याजोगी. त्याच्या निधनानंतर शहनाजच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. पण, आता मात्र ती या अडचणींवर मात करुन वाट पुढे चालताना दिसत आहे.
'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटातून शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ती सलमानसोबत (Salman Khan) काम करण्याचाही अनुभव घेणार आहे.
शहनाजसाठी ही एक मोठी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या अभिनय क्षेत्रात आपली ओळख तयार करण्यात व्यग्र असणाऱ्या शहनाजनं कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ती सध्या सेलिब्रिटी होस्ट आणि डान्सर, राघव जुयालला डेट करत आहे. सध्यातरी ही जोडी त्यांचं हे नातं सर्वांसमोर आणू इच्छित नाही. परिणामी योग्य वेळेच्या प्रतिक्षेत असल्यामुळं ते दोघंही नातं लपवताना दिसत आहेत. (Actress shehnaaz gill said to be dating raghav juyal keeps relationship secret)
काही दिवसांपूर्वीच त्यांना विमानतळावरही एकत्र पाहिलं गेलं होतं. राघव आणि शहनाज कोणा एके ठिकाणी सहलीसाठी गेले होते असंही त्यावेळी म्हटलं गेलं होतं. त्याव्यतिरिक्त त्यांच्याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तेव्हा आता ही जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत ग्वाही केव्हा देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.