मुंबई : 'इश्क विश्क' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेझरीवाला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. चित्रपटांना अलविदा केल्यानंतर, अभिनेत्री ट्रॅव्हल राइटर बनली. दरम्यान, आता ही अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर शहनाज ट्रेझरीवालाने खुलासा केला आहे की, ती सध्या एका आजाराशी झुंज देत आहे. दरम्यान, तिने चाहत्यांसोबत आपल्या एका गंभीर आजाराचा उल्लेख केला आहे. अभिनेत्रीने एका पाठो-पाठा एक अशा अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत आणि सांगितलं आहे की, ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रोसोपॅग्नोसिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहे.




आपल्या आजाराचा संदर्भ देत शहनाज ट्रेझरीने सांगितलं की, प्रोसोपाग्रोसिया आजाराची लक्षणं काय आहेत? अभिनेत्रीने पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मला प्रोसोपाग्रोसिया नावाचा आजार आहे. आता मला समजलं की मला एकाच वेळी अनेक चेहरे का आठवत नव्हते. मी लोकांना त्यांच्या आवाजावरून ओळखते.


दुसरीकडे, शहनाजने दुसर्‍या स्लाइडमध्ये लिहिलं, 'चेहऱ्यावरील अंधत्वाची लक्षणे... तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ओळखत नाही.  खासकरून तेव्हा तुम्हाला त्यांना भेटण्याची ईच्छाही नसते.  व्यक्ती ओळखायला समजायला मला एक मिनिट लागला आहे. अभिनेत्रीने तिच्या आजाराशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.