मुंबई : तब्बल १३ वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सामाजिक कामात कायम अग्रेसर असते. आता पुन्हा तीने स्वत:च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिल्पा आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासाठी सोमवारी फार मोठा दिवस होता. 'स्वच्छ भारत अभियाना'ला प्रोत्साहन देण्यासाठी तिचे फार मोठे योगदान दिले आहे. 
 
तिच्या या कामाची चिकाटी पाहता देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शिल्पाला पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोमवारी शिल्पाला Champion of Change 2019 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती म्हणते, 'मला असं वाटतं की आपल्या देशाला स्वच्छ ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जर आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला देश स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे.' अशा प्रकारे देशाप्रती असणारं आपलं कर्तव्य तिने यावेळेस व्यक्त केलं.


२०१९ मध्ये तिने ४८० झाडे लावली आहेत. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'माला या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे मी स्वत: खूप भाग्यशाली समजते.' असं म्हणत तिने अन्य जणतेला देखील 'स्वच्छ भारत अभियाना'ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 


शिल्पा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ती 'हंगामा' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये त्याचप्रमाणे 'निकम्मा' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.