मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्यावसायिकाने 21 लाखांचे कर्ज न फेडल्याबद्दल शेट्टी कुटुंबाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. व्यावसायिकाच्या आरोपांमुळे शेट्टी कुटुंब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.  एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अंधेरी कोर्टाने शिल्पा शेट्टी कुंद्रा, शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांच्या विरुद्ध 21 लाखांचे कर्ज न फेडल्याचा आरोप करून एका व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनंतर समन्स जारी केले आहेत.' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



काय आहे प्रकरण? 
शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी 21 लाख रुपये कर्ज घेतल्याचा दावा व्यावसायिकाने केला आहे. करारानुसार जानेवारी 2017 मध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम त्यांना द्यायची होती. पण शेट्टी कुटुंबाने परतफेड केली नाही. 


न्यायालयाने तिघींना 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा पुन्हा वाद्याच्या भोवऱ्यात अडकली आहे.