Friendship Day 2024: बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमी चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या खास मित्राची झलक दाखवली आहे. श्रद्धा कपूरने तिच्या पाळीव प्राण्यासोबतचा अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर पाळीव प्राण्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने 'कोण म्हणतं की बेस्ट फ्रेंड फक्त माणूसच असावा'? असं कॅप्शन तिने दिलं आहे. 


'फ्रेंडशिप डे' निमित्त श्रद्धा कपूरच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ही खरी मैत्री आहे अशा कमेंट करत चाहत्यांनी तिला 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत अभिनेत्रीच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आल्या आहेत. 



श्रद्धाचा आगामी चित्रपट


नुकताच अभिनेत्रीच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री'चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली होती. 'स्त्री 2' चे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी केले असून या चित्रपटात राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. 


'स्त्री 2'च्या प्रमोशनमध्ये श्रद्धा व्यस्त 


अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट हिट होण्यासाठी श्रद्धा कसलीच कसर सोडत नाहीये. नुकतीच ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमसह लखनऊ विद्यापीठात गेली होती. तिथे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव केला. 


'आज की रात' गाण्याला तुफान प्रतिसाद


नुकतेच 'स्त्री 2' चित्रपटातील 'आज की रात' हे गाणं रिलीज झालं आहे. सध्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात या गाण्यावर रील्स देखील चाहते तयार करत आहेत. या गाण्याला चाहत्यांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे आता फक्त चाहत्यांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागणी आहे.