अभिनेता कमल हासनच्या लेकीला लागलं दारू आणि सिगारेटचं व्यसन? स्वत: केला मोठा खुलासा
अभिनेत्री श्रुति हासनसाठी 2023 हे खूप सुंदर वर्ष आहे. तिने दोन ब्लॉकबस्टर तेलुगू सिनेमा वीरा सिम्हा रेड्डी आणि वाल्टेयर वीरैयामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. नन्ना`मधील तिच्या पात्राला खूप पसंतीही मिळाली. लवकरच प्रभास स्टारर `सालार: पार्ट 1 - सीजफायर`मध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
मुंबई : अभिनेत्री श्रुति हासनसाठी 2023 हे खूप सुंदर वर्ष आहे. तिने दोन ब्लॉकबस्टर तेलुगू सिनेमा वीरा सिम्हा रेड्डी आणि वाल्टेयर वीरैयामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. नन्ना'मधील तिच्या पात्राला खूप पसंतीही मिळाली. लवकरच प्रभास स्टारर 'सालार: पार्ट 1 - सीजफायर'मध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. श्रुति हासनचा हा सिनेमा पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
नुकतंच श्रुति हासनने मोठा खुलासा केला की, तिने दारु सोडण्याचा निर्णय का घेतला आणि सेल्फ कंट्रोलच्या प्रवासाला का सुरुवात केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, ती खूप पार्टी करते का? यावंर श्रुति म्हणाली, मी असं सगळं करायची आधी पण आता मी एकदम सोबर झाली आहे. जेव्हा तुम्ही दारु पित नसता तेव्हा पार्टीत दारु पिणाऱ्या लोकांना तुम्हाला सहन करणं कठीण आहे."
मात्र ला कोणताच पश्चाताप नाही. कोणीच हँगओव्हर नाहीये आणि माझ्यासाठी सोबर राहण सगळ्यात चांगलं आहे. तिने पुढे याविषयी बोलताना सांगितलं की, ती कोणालाच दारु पिणाऱ्यांना जज करत नाही. मी कधीच ड्रग्ज घेतले नाही. मात्र दारु ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट होती. मात्र आता माझ्यासाठी अजिबात नाही. कशाही पॉजिटीव्हरित्या कामाची नाही राहिली. पहिली मला सवय होती. आणि मी नेहमी माझ्या मित्रांसोबत दारु पिण्याचा विचार करायची.नंतर मला असं वाटू लागलं जसं, मी याच्या कंट्रोलमध्ये होती. सिगरेट माझ्यासाठी अजून खराब होती.''
श्रुति हासनने हे देखील शेअर केलं की, ती अशा अनेक लोकांपासून दुरावली विशेषत: फ्रीलोडर्सपासून लांब होण्याचा तिने निर्णय घेतला. कारण ज्यांनी ज्यांनी तिला सतत पार्टीसाठी फोर्स केला याचमुळे तिला दारु पिण्याची सवय लागली होती असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री श्रुति हासनची लोकप्रियता सर्वाधिक आहे. श्रुति मल्टीटॅलेंटेड असून तिचं फॅन फॉलोइंग जास्त आहे. तसेच श्रुति साऊथचे सुपरस्टार कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे. श्रुति अनेकदा लाइमलाइटपासून दूर असते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. हल्लीच तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल तिच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केलं आहे जे फार चर्चेत आहे.