मुंबई : मराठीमध्ये 'चंद्रमुखी' हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून. आता 'चंद्रमुखी' हे नाव पाहताही येणार आहे. लवकरच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपल्याला चंद्रमुखी पाहता येणार आहे.
 
अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विश्वास पाटील लिखित 'चंद्रमुखी' ही राजकारण आणि तमाशाची कला यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि 'चंद्रमुखी'च्या पात्राला अचूक न्याय अमृता खानविलकर देणार आहे. तर दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या सिनेमातील चंद्रा हे गाणं खूप गाजत आहे. हे गाणं एवढं लोकप्रिय झालं आहे की, हे गाणं युट्यूबर ट्रेंडिंगमध्ये आहे. अमृता खानविलकरचे अनेक चाहते या गाण्यावर रिल्स बनवून शेअर करत आहेत. अनेक सेलिब्रिटीही या रिल्सचा भाग बनत आहेत. आता या गाण्यावर अभिनेत्री सोनालीने ठेका धरला आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.



सोनाली कुलकर्णीने व्हिडिओ शेअर करताच व्हायरल होऊ लागला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. मुख्य म्हणजे सोनालीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.