मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री घरातून बाहेर पडताच कॅमेऱ्यात कैद होतात. यानंतर त्यांचे लूक, ड्रेस आणि फॅशन स्टेटमेंट्ही चर्चेत येतात. आता असंच काहीसं अभिनेत्री दिव्या खोसला कुमारसोबत घडलं आहे. दिव्या नुकतीच मुंबईत लंचसाठी घरातून निघाली होती आणि यादरम्यान तिला पापाराझींनी स्पॉट केलं आणि आता तिच्या लूकचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्ट्रॅपी मॅक्सीमध्ये स्टाइलिश अंदाज
यादरम्यान दिव्या खोसला कुमार व्हाइट कलरच्या स्ट्रॅपी मॅक्सी ड्रेसमध्ये अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली. अभिनेत्रीचा हा ड्रेस चर्चेत आला आहे. खरंतर, जेव्हा दिव्या समोरून दिसली तेव्हा ती सिंगल ड्रेसमध्ये दिसत होती. पण जेव्हा तिला पाठून पाहिलं असता, त्यात ती स्कर्ट टॉप लूकमध्ये दिसत होती. मात्र, हा दिव्याचा टू पीस नसून वन पीस ड्रेस आहे. जो वरून ब्रॅलेटमध्ये आहे आणि खालून मॅक्सी लूकमध्ये आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करीना-अनुष्काला टक्कर
दिव्या खोसला कुमारने तिचा समर लूक अतिशय साधा ठेवला होता. यादरम्यान तिने फ्लॅट फुटवेअरसोबत हा मॅक्सी ड्रेस कॅरी केला आहे. त्याचबरोबर, सनग्लास आणि केसांचा बन तिच्या लूकला अधिक रिफ्रेशिंग टच देत होता. दिव्या मागे वळून पापाराझींसाठी पोज देताना दिसली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचं म्हणणं आहे की, ती फॅशनच्या बाबतीत करीना कपूर खानपासून अनुष्का शर्मासारख्या फॅशनिस्टांना जबरदस्त टक्कर देते.