सुष्मिता सेनवर हे काय पाहण्याचे दिवस...? कुटुंबात आनंद नांदणार तरी कधी?
राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते.
Rajeev Sen and Charu Asopa: सुष्मिता सेन नुकतीच आपल्या ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे (Sushmita Sen and Lalit Modi) चर्चेत आली होती. हे प्रकरण महिना दोन महिना तरी गाजले होते. ललित मोदी आणि सुष्मिता सेनची चर्चा थेट त्यांच्या लग्नापर्यंत गेली होती. परंतु हे प्रकरण कुठे थांबतंय तोच सुष्मिता सेनच्या भावाचे प्रकरण वर आले. राजीव सेन आणि चारू असोपा (Rajiv Sen and Charu Asopa) यांच्या नात्यातही दुरावा येतो आहे. सुष्मिताच्या आयुष्यात प्रेम आलं पण अनेकदा ते तिच्यापासून दूर गेलं. आता कुटुंबातील सख्ख्या भावाच्या वैवाहिक आयुष्यातही वादळं आल्यामुळं सुष्मिताच्या जीवनातील कसोट्यांचा पाढा काही संपत नाहीये. (actress sushmita sen faces family problems brother rajiv sen and wife charu chopra takes big decision)
राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आहे. लग्नानंतर काही दिवसांतच दोघेही त्यांच्या वैवाहिक वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. चारूने एका मुलाखतीत सांगितले होते की, ''राजीव यांना अनेक समज-गैरसमज आहेत आणि आता मी ते सहन करू शकत नाही. मी त्याला एक साधी नोटीस पाठवून वेगळे होण्यास सांगितले होते कारण आमच्या नात्यात आता काहीही राहिलेले नाही. मला वेगळे व्हायचे आहे कारण माझी मुलगी अशा अपमानास्पद वातावरणात वाढू इच्छित नाही'', अशी भावना तिनं व्यक्त केली होती.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
यापूर्वी दोघांनीही त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला होता ज्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती. मात्र आता पुन्हा दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एवढेच नाही तर दोघांचे नाते पुन्हा एकदा तुटण्याच्या मार्गावर आले आहे. हा प्रकार त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार चारू असोपा आणि राजीव सेन यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यांची ही कृती पुन्हा एकदा हेच दाखवून देत आहे की त्यांच्यात परत एकदा मतभेद सुरू झाले आहेत. इतकेच नाही तर चारू आणि राजीव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे फोटोही डिलीट केले आहेत. करवा चौथनंतरच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. (Rajiv Sen and Charu Asopa Instagram)
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
राजीव आणि चारूच्या इन्टाग्रामवर त्यांचे एकत्र फोटोज पाहायला मिळत नाहीयेत. अलीकडेच चारू आणि राजीव यांनी त्यांचे काही रोमँटिक फोटो शेअर केले होते. हे फोटो त्यावेळचे आहेत जेव्हा दोघे एकत्र चित्रपट पाहायला गेले होते, जे आता डिलीट करण्यात आले आहे. (Rajiv Sen and Charu Asopa Photos) याशिवाय इन्स्टावरून त्यांनी पोस्ट केलेली लांबलचक नोटही शेअर केली होती तीही डिलिट करण्यात आली आहे.