वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री तब्बूनं वाढवलं इंटरनेटचं तापमान
Tabu Deep Neck Dress Photos: अभिनेत्री तब्बू ही कायमच तिच्या उत्कृष्ट अभिनसाठी चर्चेत असते. सध्या तिच्या फोटोंची बरीच चर्चा रंगलेली आहे. तिनं इन्टाग्रामवरून आपले हॉट फोटोज शेअर केले आहेत ज्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत.
Tabu Summer Beach Photos: सुंदर दिसायला कशाचेच बंधन नसते. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. वय उलटून गेले असले तरीसुद्धा या अभिनेत्रींच्या सौंदर्यात जरादेखी कमी झालेली नाही. याचे अगदी ताजे उदाहरणं म्हणजे अभिनेत्री झनीत अमात. त्यांनी काही दिवसांपुर्वीच इन्टाग्राम जोईन केले आहे. त्या इन्टाग्रामवर चांगल्याच सक्रिय असतात. त्यामुळे त्या रोज त्यांचे नवनवीन फोटोज हे शेअर करताना दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या जुन्या फोटोंनाही त्या शेअर करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. वयाच्या 71 व्या वर्षीही त्यांचा हा बोल्डनेस पाहून आजची पिढीही आवाक होते आहे. त्यातून दुसरं नावं म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांचे. वयाच्या 53 व्या वर्षीही त्या एव्हरग्रीन दिसतात.
माधुरी दीक्षितच्याही सौंदर्याचे कौतुक आजही होताना दिसते. सर्वसामान्यांना कायमच हा प्रश्न पडतो ती या वयातही या अभिनेत्री इतक्या सुंदर कशा आणि इतक्या फीट कशा, माधुरी दीक्षितही आता 60 कडे झुकते आहे. परंतु 70,80 आणि 90 चं काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रींच्या सौंदर्याचे आज इतक्या वर्षांनीही कौतुक होताना दिसते. परंतु या सगळ्यात एका अभिनेत्रीला विसरून चालणार नाही आणि ते म्हणजे अभिनेत्री तब्बू. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही तब्बू 20-25 तल्या मुलीला लाजवेल इतकी सुंदर दिसते. सध्या तिच्या बीचवरील त्या फोटोंनी त्याचे उत्तर दिलेच आहे.
हेही वाचा - जेनेलिया देशमुखच्या लॉकेटनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रितेश म्हणाला, ''माझ्याशी लग्न करशील?'
अभिनेत्री तब्बू ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यावेळी तिनं आपली उन्हाळ्याची सुट्टी चांगलीच एन्जॉय केली आहे. तिनं बीचवरील तिचे काही कोझी फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. बिचवर बसून ती आपला मी टाईम एन्जॉय करताना दिसते आहे. रूपेरी पडद्यावरही तब्बू अत्यंत आकर्षक दिसते. सध्या तिच्या या फोटोंवरती नेटकऱ्यांच्या नानाविध कौतुकास्पद कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या या बोल्ड फोटोंची. तिनं पांढऱ्या रंगाचा समर गाऊन घातला आहे. त्यात तो अत्यंत डीप नेक असा आहे. यावेळी तिनं केस मोकळे सोडले आहे आणि फारच लाईट मेकअप केला आहे. सोबतच तिनं गोल्डन रंगाच्या इयरिंग्स घातल्या आहेत.
सध्या तिच्या या फोटोखाली चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. अनेक बॉलिवूडच्या नायिकांनाही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सध्या तिचे हे फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत.