जेनेलिया देशमुखच्या लॉकेटनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रितेश म्हणाला, ''माझ्याशी लग्न करशील?''

Genelia Deshmukh Locket: जेनेलिया देशमुख ही आपल्या हटके अदाकारी प्रेक्षकांचे मनं कायमच जिंकून घेते. सध्या तिच्या एका फोटोशूटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच फक्त तिचीच चर्चा आहे. तिच्या लॉकेटनं विशेष करून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 13, 2023, 09:56 PM IST
जेनेलिया देशमुखच्या लॉकेटनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रितेश म्हणाला, ''माझ्याशी लग्न करशील?'' title=
June 13, 2023 | Genelia Deshkmukh locket with word maa impresses netizens photos goes viral (Photo:Genelia Deshmukh | Instagram)

Genelia Deshmukh Locket: जेनेलिया देशमुखची अनेकदा चर्चा होत असते. रितेश आणि जेनेलिया हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या फोटोजना आणि व्हिडीओजना चाहत्यांकडून प्रचंड लाईक्सही येतात. जेनेलिया आणि रितेश हे विशेष चर्चेत असतात ते म्हणजे त्यांच्या मुलांमुळे. पापराझी दिसले की रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुलं त्यांना नमस्कार करतात. हे पाहून नेटकरी आणि चाहते त्यांचे अनेकदा कौतुक करताना दिसतात. सध्या जेनेलियाच्या एका खास फोटोशूटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटमध्ये जेनेलियानं एक लॉकेट घातलं आहे. ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या लॉकेटवरील आगळ्यावेगळ्या नावानं चाहत्यांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केले आहे. 

जेनेलियाचे हे फोटोशूट सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसते आहे. तिच्या या फोटोखाली चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स येताना दिसत आहेत. जेनेलिया यावेळी एका फॅंगशनच्या निमित्तानं स्पॉट झाली. यावेळी फक्त तिचीच चर्चा रंगलेली होती. यावेळी तिनं ब्लेझर आणि पॅन्ट घातली होती. तिच्या ब्लेझर आणि पॅन्टचा रंग काळा होता आणि त्यावर गोल्डन रंगाचे डिझाईन होते. यावेळी तिनं तिच्या गळ्यात एक लॉकेट घातलं होतं. त्यावर नेटकऱ्यांनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले, तर रितेशनं तिच्या या फोटोखाली भन्नाट कमेंट केली आहे. तो म्हणाला की, ''माझ्याशी लग्न करशील?'' त्याच्या या कमेंटखाली नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

हेही वाचा - वयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च

सध्या रितेशच्या या कमेंटखालीही चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेलच की नक्की तिच्या लॉकेटवर लिहिलंय तरी काय? तिनं 'मां' नावाचं लॉकेट परिधान केलं आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवरती नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत एकानं लिहिलंय की, ''देशमुख वहिनी तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''तुम्ही खुपच सुंदर आई आहात''. तर जेनेलिया वहिनी म्हणत अनेकांनी तिच्या लुकचे कौतुकही केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेनेलिया आणि रितेशचा मागच्या वर्षी 'वेड' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. आता रितेश आणि जेनेलिया कुठल्या नव्या आगामी चित्रपटातून दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. वेड या चित्रपटातून जेनेलियानं मराठी चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं होतं.