मुंबई : ग्लॅमरच्या जगात हल्लीअभिनेत्री तमन्ना भाटियाची वेगळीच चर्चा आहे. मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये आपली अनोखी छाप पाडणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या अप्रतिम फॅशन चॉईस उत्तम अभिनय आणि अविश्वसनीय डान्स मूव्ह्ससोबतच तमन्ना एक नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडच्या काळात तमन्नाचा दमदार परफॉर्मन्सने तिने प्रेक्षकांची मन जिंकली असून रेड कार्पेटवर ती नेहमीच चर्चेत असते. सध्या तिने 'जी ​​करदा आणि लस्ट स्टोरीज 2 मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांना प्रभावित केलं आहे.


तिच्या अभिनय कौशल्यासोबतच तमन्नाचं नृत्य कौशल्यही तितकेच मोहक आहे. तिच्या कावालेया या आगामी गाण्याने तिने पुन्हा एकदा नृत्याची अनोखी झलक प्रेक्षकांना दाखवून ती ट्रेंडमध्ये आली आहे. तमन्ना भाटिया नॅशनल क्रश म्हणून नवीन ओळख संपादन करत असून मनमोहक व्यक्तिमत्त्व म्हणून ती प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. जेलर आणि भोला शंकर ते अरमानाई 4 आणि  शिवाय तमन्नाकडे निखिल अडवाणी दिग्दर्शित वेदा हे चित्रपट आहेत.


तमन्ना भाटिया मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. तिच्या अभिनयाबरोबर तिचं सौंदर्य आणि डान्ससाठी तमन्ना ओळखली जाते. सध्या ती रजनीकांत यांच्याबरोबरच्या चित्रपटामधील कावालेया गाण्यामुळे इन्स्टाग्रामपासून सर्वच सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काही वर्षांपासून ती हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रामुख्याने दिसू लागली असली तरी अनेक वर्षांपासून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे.  


'जेलर' हा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या या सुपरहीट ट्रेलरची. 72 वर्षांचे रजनीकांत आजही तितकेच एव्हरग्रीन दिसतात. चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया त्याचसोबत 'बाहुबली'ची शिवगामीदेवी म्हणजेच राम्या कृष्णनही दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. जॅकी श्रॉफ, शिव राजकुमार आणि योगी बाबू यांच्या प्रमुख भुमिकाही आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 


सोशल मीडियावर तिचे अपडेट्स नेहमी शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.