प्रशांत अनासपुरे, झी 24 तास, मुंबई : अभिनेत्री तनुजा यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तनुजा यांना भेटण्यासाठी काजोल नुकतीच गेली होती. लीलावती हॉस्पिटलमध्ये तनुजा यांच्यावर उपचार सुरू आहेत. तनुजा यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काजोलचे सासरे आणि अजय देवगणचे वडिल वीरू देवगण यांचे नुकतेच निधन झाले. मात्र त्याचवेळी तनुजा यांचीही प्रकृती बिघडल्याने काजोलची मोठीच धावपळ उडाली. मात्र तनुजा यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना २-३ दिवसांत हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येणार असल्याचं निकटवर्तीयांनी सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तनुजा या नुकत्याच 'अ डेथ इन द गंज', 'आरंभ' आणि 'सोनार पहाड' सिनेमातून समोर आल्या. त्यांनी 'मेम दीदी', चांद और सुरज, बहारे फिर भी आएंगी आणि ज्वेल थीफ सहीत अनेक हिट सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. एक्शन डिरेक्टर वीरु देवगन यांच्या निधनानंतर अजय देवगनवर आणि परिवारावर सध्या शोककळा आली आहे. अजय देवगण सोबत या काळात बॉलीवुडमधील अनेक कलाकार दिसून आले. ऐश्वर्या राय देखील आपला पती अभिषेक बच्चन सोबत अजयच्या घरी पोहोचली. यावेळी काजोल स्वत:चे अश्रू आवरु शकली नाही.