मुंबई : वडिलांसोबत पांढरा फ्रॉक घालून वाढदिवस साजरा करणारी ही गोंडस चिमुरडी आज टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. ही मुलगी बिग बॉस सीजन 15 ची विजेती ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने प्रेमाचा शोधही याच शोमध्ये घेतला आणि आज तिच्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसत आहे.


अलीकडे, अभिनेत्रीचे काही बालपणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवरुन अनेकांना तिला ओळखणे कठीण झाले आहे.


ही अभिनेत्री नुकतीच एकता कपूरची नवीन 'नागिन' बनली आहे. त्याचबरोबर ती लव्ह- लाईफमुळेही खूपच चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तेजस्वी प्रकाश आहे.


बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाशला या शोमुळे घराघरात पोहोचली आहे. सोबतच तिचा काही प्रोजेक्टस आणि तिचा लाईफ पार्टनर देखील भेटला आहे.



तिने केवळ शोचं टायटल जिंकलं नाही, तर ती एकताची नागिन ही बनली.  सध्या सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्य़ामुळे ती खूपच चर्चेत आहे.