मुंबई : बॉलिवूड गाजवल्यानंतर हॉलिवूडमध्ये जात तिथंही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्न केलं. ज्यानंतर ती बराच वेळ परदेशातच व्यतीत करताना दिसली. (Priyanka chopra nick jonas)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तर प्रियांका आणि निक, यांनी त्यांच्या या नात्यात एका गोड गोंडस मुलीचं स्वागत केलं आहे. सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका आणि निकला पालकत्त्वं मिळालं आहे. 


प्रियांकाच्या मुलीच्या जन्मानंतर ती नेमकी कशी जिसत असेल, तिचं नाव काय, तिच्यासाठी प्रियांकानं घर कसं सजवलंय असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले. 


गोड बातमी दिल्यानंतर आतापर्यंत ही 'देसी गर्ल' बरीच व्यग्र असावी की काय, तिनं सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नव्हती. 


अखेर, ती सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाली आहे. जिथं तिनं एक सेल्फी शेअर केला आहे. प्रियांकाला किस मिळत असल्याचाच हा सेल्फी. 


बरं, तिला किस करणाऱ्यांपैकी निक नाही... आता तुम्ही म्हणाल निक नाही, तर मग कोण? 


तर, प्रियांकाला खूप दूरवरून किस करणारा हा कोणी व्यक्ती नसून तो आहे, सूर्य. 'सनकिस्ड' सेल्फी, हा ट्रेंड तर तुम्हाला ठाऊक असेलच. 



प्रियांकानं तिचा असाच सनकिस्ड फोटो पोस्ट करत सर्वांना हैराण केलं. 


लेकिच्या जन्मानंतर आनंदाच्या शिखरावर असणाऱ्या प्रियांकाचा हा फोटो सध्या इंटरनेट गाजवतोय असं म्हणायला हरकत नाही.