मुंबई : लोकप्रिय बंगाली टेलिव्हीजन अभिनेत्री  पायल सरकार अडचणीत सापडली आणि तिनं थेट कोलकाता पोलिसांच्या सायबर क्राईममध्येच याबाबतची तक्रार दाखल केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका दिग्दर्शकाच्या फेक अकाऊंटवरुन पायलला अश्लील मेसेज आल्यानंतर तिन टोकाचं पाऊल उचलत हा सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेस आणून दिला. माध्यमांशी संवाद साधताना तिनं यासंदर्भातील काही गोष्टी उघडकीस आणल्या. 


पायलनं एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावे आलेली फ्रेंड रिक्सेवस्ट एक्सेप्ट केली होती. ज्यानंतर काही वेळातच मेसेंजर चॅटच्या माध्यमातून तिला एका मोठ्या चित्रपटासाठी निवडण्यात आल्यासं सांगण्यात आलं. पुढे याच चॅटलवरुन तिला अश्लील मेसेही आले. 


पायलनं तिच्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून या चॅटचे काही स्क्रीनशॉट शेअर करत आपल्या मित्रांना हे अकाऊंट फेक आहे की खरंच एका दिग्दर्शकाचं अकाऊंट आहे, याबाबत पडताळणी करण्यास सांगितलं. पुढे हे अकाऊंट बनावट असल्याची धक्कादायक बाब तिच्यासमोर आली. 


प्रथमत: कोलकाता सायबर सेलकडे दाखल करण्यात आलेली यासंदर्भातील तक्रार पुढे बराकपोर पोलीस आयुक्तालयाकडे सोपवण्यात आली. ज्यानंतर हे अकाऊंटही ब्लॉक झालं. सदर प्रकरणाचा तपास सुरु असून या अकाऊंटसंदर्भातील माहितीच्या प्रतिक्षेत आपण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. 


दरम्यान, ज्या दिग्दर्शकाच्या नावे हे अकाऊंट सुरु करण्यात आलं होतं, त्य़ांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीने यासंदर्भात कारवाई करण्याचे संकेत दिले. तेव्हा आता या प्रकरणात मूळ दोषी कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.