मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 21 वर्षीय कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचं निधन झालं आहे. चेतना यांनी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर चेतनाने आदल्या दिवशीच वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेतील चुकीमुळे दुसऱ्या दिवशी तिला फुफ्फुसात त्रास होवू लागला आणि तिचा मृत्यू झाला.
 
आई-वडिलांपासून लपवून गुप्तपणे करत होती सर्जरी
रिपोर्ट्सनुसार, चेतनाने तिच्या आई-वडिलांना तिच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं नव्हतं ती तिच्या मित्रांसह एकटी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा लावला आरोप 
सर्जरीनंतर अभिनेत्रीच्या शरीरात काही बदल होऊ लागले आणि अभिनेत्रीच्या फुफ्फुसात द्रव जमा होऊ लागला. त्यानंतर चेतनाचा मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या पालकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात तक्रारही दाखल केली आहे.



चेतनाबद्दल बोलायचं झालं तर ती कन्नड टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक टीव्ही शोमध्ये काम करून तिने आपली खास ओळख निर्माण केली. चेतनाला गीता दोरेसानी या मालिकेतील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी विशेष ओळखलं जातं. चेतनाच्या या जगातून अचानक जाण्याने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. चेतनाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच दुःख झालं आहे.