उर्फी जावेदकडून बोल्डनेसच्या हद्द पार..दोऱ्यांनी बनवला स्कर्ट, ब्रालेट
उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या बोल्ड अवतारने खळबळ उडवली आहे.
मुंबईः इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची फॅशन स्टाइल वेगळी आहे. उर्फी अनेकदा तिच्या ड्रेसवर प्रयोग करत असते, जे लोकांना खूप आवडतात. त्याचबरोबर ती तिच्या कपड्यांवरून ट्रोल होत असते. आता उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या बोल्ड अवतारने खळबळ उडवली आहे.
उर्फी जावेदने दोऱ्यांनी बनवलेला ड्रेस घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ब्रॅलेटसह दोरीने बनवलेल्या स्कर्टमध्ये उर्फी सुपर हॉट दिसत आहे. उर्फी कॅमेऱ्यासमोर तिचा ड्रेस फ्लॉंट करताना दिसत आहे. उर्फीने घातलेला स्कर्ट खूपच लहान असून त्यात एक स्लिट आहे, ज्यामुळे ती अधिक बोल्ड दिसत आहे.
उर्फीच्या या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. यापूर्वी उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने तिचा टी-शर्ट कापून बॅकलेस टॉप बनवला होता आणि नंतर तो परिधान करून विमानतळावर पोहोचली होती.