मुंबई : कलर्स मराठीवरील बिग बॉस कार्यक्रमाला सुरूवात झाली. आता हे सर्व स्पर्धक या घरात १०० दिवस राहणार आहेत. या १०० दिवसात त्यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क असणार नाही. बिग बॉसचा मराठमोळा वाडा अतिशय सुंदर असून यात राहणाऱ्या १५ स्पर्धकांना येथील प्रत्येक गोष्टा आश्चर्याचा सुखद धक्का देते. त्याचबरोबर स्पर्धकांना मिळणारे मानधनही त्यांना सुखावणारे आहे. पण या सर्व स्पर्धकांमध्ये सर्वात जास्त मानधन कोणाला मिळते ठाऊक आहे?


या अभिनेत्रीला मिळते सर्वाधिक मानधन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या १५ स्पर्धकांमध्ये जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही आहेत. मराठीबरोबरच हिंदीत ही त्यांनी चांगले नाव कमावले आहे. त्या हिंदी मालिकांसाठी भरगोस मानधन घेतात तर मराठीत मालिकांसाठी दिवसाला ३०-४० इतके मानधन त्यांना मिळते. म्हणूनच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठीच्या घरात राहण्यासठी त्यांना उत्तम मानधन देण्यात येणार आहे. एका आठवड्यासाठी त्यांना तब्बल ३-४ लाख रुपये मानधन मिळणार आहे.


त्यानंतरच्या क्रमवारीत या कलाकारांचा नंबर


त्याचनंतर जबरदस्त मानधन कमावणारी स्पर्धक आहे अभिनेत्री रेशम टिपणीस. त्यानंतर मानधनाच्या क्रमावारीत राजेश शृंगारपुरे, अनिल थत्ते, आस्ताद काळे यांचा नंबर लागतो.