मुंबई : कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेत्री शनाया कटवे हिला हुबळीच्या पोलिसांनी अटक केली आहे. शनायावर तिच्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनायाचा भाऊ राकेश कटवे यांचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांना राकेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देवरगुडीहल जंगलात पोलिसांना राकेश कटवे यांचे चिरलेले डोके सापडले, तर मृतदेहाचे उर्वरित तुकडे हुबळी आणि गदग रोडमधील वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी नियाज अहमद काटीगार, तौसिफ छन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिराणीवाले या चार आरोपींना अटक केली आहे. या वृत्तानुसार, पोलिसांना अशी माहिती मिळाली की या खुनामध्ये राकेशची बहीण म्हणजेच कन्नड अभिनेत्री शनाया कटवेही सहभागी होती. शनायाचे हे करण्यामागचे कारण म्हणजे तिची लव्हस्टोरी आहे. बातमीनुसार शनाया आणि नियाज एकमेकांच्या प्रेमात आहेत, परंतु तिचा भाऊ या नात्याविरूद्ध होता ज्यानंतर नियाजने राकेशला ठार मारण्याचा कट रचला. शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती. त्या दिवशी 9 एप्रिल रोजी ही घटना घडली. काटीगार आणि त्याच्या मित्राने राकेशची निर्घृण हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.



ही बाब समजताच हुबळी पोलिसांनी प्रकरणाता तपास केला आणि शनायाला अटक केली. सध्या अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शनायाचा कन्नड इंडस्ट्रीमध्ये प्रवास फार मोठा नाही. या अभिनेत्रीने वर्ष 2018 मध्येच प्रेमाम जीवनम या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.