वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन अभिनेत्रींचे चमकले नशीब, आज आहेत यशाच्या शिखरावर
कोण आहेत त्या अभिनेत्री ज्या अभिनयामुळे नाही, तर बोल्ड सीनमुळे यशस्वी...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज पाहाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मने अनेक कलाकारांना एका रात्रीत स्टार बनवले. यातील अनेक अभिनेत्री त्यांच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत आल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना बोल्ड सीन्समुळे प्रसिद्धी मिळाली आणि आज त्या यशाच्या शिखरावर आहेत.
अभिनेत्री त्रिधा चौधरी
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध वेब सीरिज 'आश्रम' फेम अभिनेत्री त्रिधा चौधरीनेही बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यानंतर ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली. आजही या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.
अभिनेत्री कियारा आडवाणी
'कबीर सिंह' आणि 'शेरशाह' सिनेमातील अभिनयामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली कियारा अडवाणी याआधी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज' या सीरिजमध्ये देखील दिसली होती. ज्यामध्ये तिने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले होते. ज्याची लोकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती.
अभिनेत्री रसिका दुग्गल (Rasika Duggal)
प्रसिद्ध वेब सीरिज 'मिर्झापूर'मध्ये अभिनेत्री रसिका दुग्गलने आपल्या बोल्ड अभिनयाची जादू दाखवली. या सीरिजमध्ये तिने पंकज त्रिपाठी आणि कुलभूषण खरबंदा यांच्यासोबत बोल्ड सीन्स चित्रीत केले होते.
अभिनेत्री कुब्रा सैत
अभिनेत्री कुब्रा सैतने 'सेक्रेड गेम्स' वेबसिरीजमध्ये अप्रतिम काम केलं. ज्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अनेक बोल्ड सीन्स केले. ते पाहून लोक थक्क झाले. तिने चित्रित केलेल्या बोल्ड सीनची खूप चर्चा झाली होती.
अभिनेत्री अदिति पोहनकर
'शी' वेबसीरीजमध्ये बोल्ड सीन्स देणारी अदिती पोहनकर 'आश्रम'मध्येही दिसली आहे. पण 'शी'मधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली. लोकांनी अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक केलं.