मुंबई : प्रसिद्ध जाहिरात गुरू आणि रंगकर्मी अॅलेक पद्मसी यांचं आज मुंबईत निधन झालंय. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वयाच्या सातव्या वर्षी द मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकापासून त्यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरूवात केली. पद्मसी यांनी जवळपास ७० हून अधिक इंग्रजी नाटकांत काम केलंय. इंग्रजीसह हिंदी नाटकातही त्यांनी काम केलं. १९८२ साली आलेल्या 'गांधी' या सिनेमात त्यांनी साकारलेली पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय जाहिरात क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं. 'लिंटास बॉम्बे' या जाहिरात कंपनीची त्यांनी स्थापना करून अनेक जाहिरातींची निर्मिती केली.


पद्मसी यांना मॉडर्न इंडियन अॅडव्हर्टायझिंगसाठी ओळखलं जातं. लिरिल, हमारा बजाज, सर्फ पावडर यांसारख्या अनेक जाहिराती देणाऱ्या पद्मसी यांनी अनेक कमर्शिअल जाहिराती बनवल्या होत्या ज्या आजही टीव्हीवर पाहायला मिळतात.  


अॅलेक पद्मसी यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलं होतं... त्यांचं पहिलं नाटक होतं 'टेमिंग ऑफ द थ्र्यू'...